प्राणायाम आणि योगा: शरीर आणि मनःस्वास्थ्याचा मूलमंत्र

पालकहो, आजची धावपळीची जीवनशैली पहाता, केवळ मोठ्यांनाच नव्हे तर छोट्या मुलांनादेखील योगा, प्राणायाम इत्यादी उपक्रमांद्वारे शरीर आणि मनःस्वास्थ्य उत्तम टिकवणे अतिशय गरजेचे आहे हे आम्ही जाणतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार देखील हे सिद्ध झाले आहे की योगा, प्राणायाम, श्वासावरील नियंत्रण या सर्व गोष्टी लहान मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक जडणघडणीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतात. परंतु आजकालची कठीण परिस्थिती पाहता पालकांव्यतिरिक्त त्यांची मुलेदेखील तेवढ्याच तणावाखाली आणि नैराश्याखाली जगत असल्याचे नुकत्याच केलेल्या एक अभ्यासात दिसून आले आहे. आणि म्हणूनच याचे गांभीर्य आणि मुलांच्या आरोग्याचे महत्त्व ओळखून आम्ही “दादर संस्कार वर्गा”च्या माध्यमातून घेऊन आलो आहोत त्यांच्या वयाला साजेसे प्राणायाम आणि योगशास्त्रातील काही सहज, सोपे आणि सुंदर व्यायामप्रकार! सर्वप्रथम यातील काही विशिष्ट प्रकारच्या क्रियांमुळे त्यांची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढीस लागतो. त्याचबरोबर भुजंगासन, ताडासन यासारख्या सहज सोप्या प्रकारांमुळे लहान मुलांच्या स्नायूंना मजबूती मिळून अतिसक्रिय आणि चंचल मुलांना शांत करण्यासाठी निश्चितच याची मदत होते. आमच्यासोबत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने आपल्याच वयाच्या मुलांसोबत हे व्यायामप्रकार करताना मुलांनादेखील फारच मजा येते. चला तर मग पालकहो, “दादर संस्कार वर्गा”मार्फत मुलांची निरोगी जीवनशैलीशी गट्टी जमवूया आणि भविष्यातील सुदृढ पिढी घडवण्यात छोटासा हातभार लावूया!