श्री शरद उपाध्ये सरांच्या आशीर्वादाचे फळ

सप्रेम नमस्कार ! श्रीगजाननाच्या कृपेने, विद्येचे आराध्यदैवत श्रीसरस्वतीमातेच्या आशिर्वादाने आणि सन्माननीय श्री. शरदजी उपाध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली "दादर संस्कार वर्गा"ला येत्या २१ मे २०२१ रोजी "पाच वर्षे" पुर्ण झाली. पालकांच्या प्रोत्साहनामुळे गेल्या चार वर्षांत दादर संस्कार वर्गात बालमित्र/विद्यार्थी सहभागी झाल्यामुळे तुमचा आमचा आनंद द्विगुणित झाला. प्रारंभी फक्त अल्प प्रमाणात बालगोपाळ सहभागी होते. पण आता मात्र गोपाळांचा व पालकांचाही संस्कार वर्गाकडे ओढा वाढला आहे! आणि खरंच ! आपल्या संस्कार वर्गाला महिन्यातून १३ वर्ग सुरू करण्यात यश प्राप्त झाले . आॅनलाईन वर्गाला सुध्दा मुंबई पुणे, नांदेड गोवा,उरळीकांचन, चिपळूण... एवढेच नव्हे तर परदेशात अमेरिका, हाॅन्गकाॅन्ग अन्यत्र उत्तम प्रतिसाद मिळाला. मुलांनी श्लोकपठण करून त्याचा अर्थ समजून घ्यावा. श्लोक म्हणण्याची गोडी लागावी. असा आमचा प्रयत्न असतोच. मुलांनी आपले विचार मांडताना निर्भिडपणे पुढाकार घेऊन संवाद साधावा. संपुर्ण जग आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना मुले सामान्यज्ञानात (जनरल नाॅलेज)मध्ये प्रगत विचारांची असावित. जेणेकरून शालेय अभ्यासक्रमात याचा निश्चितच उपयोग होईल असेच उपक्रम आयोजित करण्यात यावेत,अशी आमची संकल्पना नेहमीच असते. त्यादृष्टीने उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.आजची मुले हीच देशाची संपत्ती म्हणजेच भावी आदर्श नागरिक असणार आहेत. मुलांनी वडिलधारी व्यक्तिमत्त्वांचा मान राखावा, नम्रता अंगीकारणे तसेच संस्कारक्षम व्हावे यादृष्टीने उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. म्हणतात ना " विद्या विनयेन शोभते" ! आपला भारत देश "सुजलाम सुफलाम" "आदर्श" नागरिकच घडवू शकतात ! हीच प्रामाणिक भावना ठेवून संस्कार वर्गातील विविध अभ्यासक्रम, कार्यक्रमाद्वारे मुलांना आदर्शवत उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. "देशाचे उत्तम, आदर्श नागरिक व्हा" ! हाच दादर संस्कार वर्गाचा ध्यास! आणि हाच संदेश!! चला तर बालमित्रांनो , आपली नांवे त्वरित नोंदवून नक्किच सहभागी व्हा हं !