सांस्कृतिक / शैक्षणिक उपक्रम

कोणत्याही बालकाच्या व्यक्तिमत्वाची जडण- घडण होत असताना कुटुंब, शाळा व समाज हे तीन घटक महत्वाचे असतात. मुलांचा महत्वाचा काळ हा शाळेत व्यतीत होत असतो. शिकण्याची प्रक्रिया हि कशी असावी, पद्धती कशी असावी याविषयी अनेक चर्चा केल्या जातात. शिक्षण औपचारीक असावे कि अनौपचारिक अश्या अनेक गोष्टींविषयी चर्चा सुरु आहेत. एकीकडे आपण जास्तीजास्त ज्ञानेंद्रियांचा वापर शिक्षण घेण्यासाठी करायला सांगतो आणि दुसरीकडे पाठ्यक्रमावर आधारित चार भिंतींच्या आतील शिक्षण मुलांना देतो.हे कितपत योग्य आहे? शिक्षण हे जीवन शिक्षण असलं पाहिजे. परंतु आता एक सकारात्मक बदल या क्षेत्रात होताना दिसतो आहे. दादर संस्कारवर्गातील मुले विविध गोष्टी उत्तम रित्या आवडीने करताना दिसत आहे. Online शिक्षण पद्धतीचा वापर करून अमेरिकेतूनही मुले या उपक्रमात सामील होत आहेत. नवनवीन उपक्रमातून मुलांना शिक्षण देण्यात येत आहे.नित्य नियमाने श्लोक पठण करणे , आपले सण आणि उत्सव,पारंपारिक खेळ , लेझिम , व्यायाम , चित्र कला, गाणी गोष्टी, अन्नसंस्कार, हस्तकला, इलेक्ट्रॉनिक्स विषय प्रत्यक्ष हाताळून शिकणे , विविध कलाकृती, मूलभूत शब्दसंग्रह, मूल्यशिक्षण ,सर्व विषयांचे ज्ञान मुलांना देण्यासाठीचा हा उपक्रम.साधारणत: वयोगट ३ पासून १४ वर्षेपर्यंत मुले उत्साहाने सहभागी होत आहेत.