३ ते ७ वर्षांच्या मुलामुलींसाठी

प्रिय पालकहो, असे म्हटले जाते की “लहान मुलं ही एखाद्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात, आपण आकार देऊ तशी ती घडतात.” हे तितकच खरं आहे. बालवयात होणाऱ्या संस्कारांची शिदोरीच मुलांना भविष्यात एक उत्तम व्यक्ती बनण्यासाठी मदत करत असते. आणि म्हणूनच वय वर्षे ३ ते ७ या वयात मुलामुलींची होणारी पायाभूत जडणघडण लक्षात घेता “दादर संस्कार वर्गा”तील या आमच्या पहिल्या वयोगटातील मुलामुलींसाठी आहे धम्माल, मस्ती आणि मनोरंजनासोबतच ज्ञानाचा भरपूर खजिना! हो…अगदी बरोबर…बालमनोविकास तज्ज्ञांच्या सल्ल्याने पारंपरिक आणि आधुनिक गोष्टींची  सांगड घालून तुमच्या मुलांच्या कल्पकता आणि कल्पनाशक्तीला वाव देणारे असंख्य उपक्रम आम्ही तयार केले आहेत. यामध्ये त्याच्या वयानुसार आणि प्रत्येकाच्या बौद्धिक आकलनक्षमतेनुसार जुनी आणि नवीन बालगीते, बडबडगीते, बैठे पारंपरिक खेळ, शारीरिक अवयवांची मूलभूत माहिती आणि स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे उपक्रम, आहार आणि आरोग्याविषयीची माहिती, शब्दांची व अंकांची तोंडओळख, शारीरिक हालचाली आणि लवचिकतेसाठी खास तयार केलेले सोपे आणि सर्वांगसुंदर व्यायामप्रकार, बुद्धीला चालना देणारी कोडी, हस्तकला, चित्रकला, बालमनावरील उत्तम संस्कारांसाठी शूरवीरांच्या ऐतिहासिक कथा आणि श्लोक वर्ग, समूहगायन, मनोविकासात्मक खेळ, सामान्यज्ञान यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश यात प्रामुख्याने करण्यात आला आहे.