योगा
पालकहो, बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले असून त्यावरील उपचारही महागले आहेत. अशातच कामाच्या बैठ्या पद्धतीमुळे मोठ्यांमध्येच नाही तर लहान मुलांच्या शरीरातदेखील अगदी कमी वयातच नैराश्य, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे भयंकर आजार घर करू लागले आहेत. आणि म्हणूनच मुलांमधील या वाढत्या समस्येवरील सोपा उपाय म्हणजे योगशास्त्रातील लहान मुलामुलींसाठी फायदेशीर असे काही सोपे आणि सर्वांगसुंदर व्यायामप्रकार! “दादर संस्कार वर्गा”मध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने छोट्यांसाठी “हसत खेळत योगासने” या उपक्रमांतर्गत वय वर्षे ३ ते १४ या वयोगटातील मुलामुलींसाठी त्यांना सहज जमतील असे काही निवडक योगप्रकार आम्ही तज्ज्ञ व्यक्तीच्या सर्वेक्षणाखाली करून घेतो, ज्याचा साहजिकच परिणाम मुलांना योगासनांची आवड आणि सवय लागून त्याचा फायदा मुलांच्या अभ्यासातील एकाग्रतेवर होतो.
योगासनांमुळे मुलांच्या शरीरावर आणि मानसिकतेवर होणारे सकारात्मक बदल:
१. बौद्धिक क्षमता वाढीस लागते.
२. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रक्तदाब नियंत्रित रहातो.
३. शरीर खूप लवचिक आणि चपळ बनते, उंची वाढीस लागते.
४. एकाग्रता वाढीस लागून स्मरणशक्ती तल्लख होते.
५. अभ्यासातील भीती नाहीशी होऊन आत्मविश्वास वाढीस लागतो.
६. मुलं वारंवार आजारी पडत नाहीत तर ती कायम आनंदी आणि उत्साही रहातात.